Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राहुल गांधी यांना पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 19 सप्टेंबर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधीची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सर्व प्रदेश प्रतिनिधी सहित प्रदेश निवडणूक अधिकारी , माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच.के.पाटील, प्रदेश अध्यक्ष नानभाऊ पटोले, विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते हजर होते.

या बैठकीत दोन ठराव एकमताने करण्यात आले. पण प्रत्यक्षात हे दोन्ही ठराव मांडल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून कौलच दिला नाही. तर यशोमती ठाकूर, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख ,धीरज देशमुख बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. एकूण ४४ आमदारांपैकी फक्त १० ते १५ आमदार उपस्थित होते. असे सूत्रांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.