Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सखी वन स्टॉप सेंटर मार्फत कृषी महोत्सव मधून जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 15, डिसेंबर :-  सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली ने जिल्हास्तरीय कृषीमहोत्सव गडचिरोली जिल्हा अंतर्गत जनजागृती / माहितीपर स्टॉल लावून जनजागृती केली. गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिल्हा कृषी कार्यालय,गडचिरोली च्या वतीने दिनांक 12 ते 16 डिसेंबर दरम्यान कृषी महाविद्यालय गडचिरोली च्या प्रांगणात करण्यात आले आहे. कृषी महोत्सव दरम्यान विविध विभाग,बचत गट तथा विविध योजनांचे माहितीपर व खरेदी / विक्री चे स्टॉल लावण्यात आले आहे. त्या अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर गडचिरोली च्या वतीने जनजागृती माहितीपर स्टॉल दिनांक 12/12/2022 ते 15/12/2022 दरम्यान लावण्यात आले.

केंद्र शासन पुरस्कृत महिला व बाल विकास अंतर्गत येणारी सखी वन स्टॉप सेंटर ही एक पिडीत महिलांना आधार व एकाच छताखाली अनेक सेवा / सुविधा याप्रमाणे वैद्यकीय, समुपदेशन, कायदेशीर, पोलीस व निवास अशा सेवा / सुविधा देणारी एक महत्पपूर्ण व यशस्वी योजना आहे. सदर योजनेचे अनेक फायदे असले तरीही तुलनेने जनजागृती कमी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील मानसिक, कौंटुबिक किंवा इतर कोणत्याही हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार मिळावा व सदर योजनेचा लाभ मिळावा याकरीता जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविने गरजेचे आहे. जनजागृती च्या अनुषंगाने सखी वन स्टॉप सेंटर स्टॉल अंतर्गत विविध महिला व‍ नागरीकांना योजनेची माहिती देण्यात आली. आपल्या आसपास पीडीत महिला आढळल्यास 181,1098 तथा जिल्ह्यातील सखी वन स्टॉप सेंटर ला संपर्क करण्याचे आवहन करण्यात आले. त्याप्रमाणे सामान्य नागरीक तथा महिलांनी मोठ्या संख्येने स्टॉल ला भेट देवून या योजनेची माहिती जाणून घेतली व अशी पीडीत महिला आढळल्यास सखी वन स्टॉप सेंटर ला अवगत करुन सहाय्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

सखी वन स्टॉप सेंटर च्या दिनांक 13/12/2022 ते 15/12/2022 या तीन दिवसीय माहितीपर स्टॉल च्या यशस्वीतेकरीता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,गडचिरोली, प्रकाश भांदककर,यांच्या मार्गदर्शनात तसेच सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली च्या केंद्रप्रशासक व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहाय्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

Comments are closed.