Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘म्युकरमायकोसिसचे पुण्यात 300 पेक्षा जास्त रुग्ण

पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे 21 मे:- पुणे जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी) रुग्ण आहेत. यासंदर्भातल्या इंजेक्शनची कमतरता आहे, असं यावेळी अजित पवार म्हणाले.पुण्यात 300 पेक्षा जास्त म्युकरमायकोसिसचे (काळी बुरशी) रुग्ण आहेत. जिलह्यात बाहेरचे रुग्ण अॅडमिट आहेत. यासंदर्भातल्या इंजेक्शनची कमतरता आहे. कारण हा आजार झालेल्या व्यक्तीला दिवसाला 6 इंजेक्शन्स द्यावी लागतात. पुढच्या 10 दिवसात राज्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेणार, असंही ते म्हणाले. लॉकडाऊनविषयी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन संपायला अजून 10 दिवस बाकी आहे. 10 दिवसांत काय होतं ते बघून पुढचा निर्णय घेऊ.

mucormycosis patients_

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. या आजाराला ‘म्युकर मायकॉसिस’ म्हणतात.कोव्हिड बरा झालेल्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्यानंतर अशा रुग्णांना राज्य सरकारकडून मोफत उपचार दिले जातील अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोव्हिड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे. एका बुरशीमुळे होणाऱ्या संसर्गामुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे.

 

Comments are closed.