Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी पक्षाला रामराम ; आदिवासी विद्यार्थी संघटनावर विश्वास करीत जाहीर प्रवेश.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 30 एप्रिल :अहेरी तालुक्यात दामरांचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते अशोक ढोलगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करीत आविसं मध्ये प्रवेश केला आहे. अहेरी विभागात लोकप्रिय म्हणून परिचीत असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यावर विश्वास ठेवून आविसं मध्ये जाहीर प्रवेश केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रम हक्कीम फक्शन हाल येथे घेण्यात आले.

यावेळी उपस्थित दामरंचां ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, मांड्रा ग्रामपंचायतचे सरपंच विलास मडावी, किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आविसं एटापल्ली सचिव प्रज्वल नागूलवार, मीना ओंडरे बालकल्याण सभापती, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, ज्योती सडमेक नगरसेविका, नौरस शेख नगरसेविका, विलास सिडाम नगरसेवक, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, विलास गलबाले नगरसेवक, महेश बाकेवार नगरसेवक, सम्मा कुरसाम सदस्य, वनाश्री सिडाम, ज्योती सुरामवार, कोमल तोरेम, विनोद दुल्लावार, दादाराव सडमेक, जिलकरसल मडावी, दादाराव सडमेक, मनोहर आत्राम, सुरज सिडाम, प्रमोद कोडापे, सुधाकर आत्राम, संजय सडमेक, इंदिरा कत्तके, करिस्मा मडावी, शिवराम पुलूरी, नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.