Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी तालुक्यातील कमलापूर दादा फ्रेंड्स क्लब कडून व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 30 एप्रिल :अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन नुकताच भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष कमलापूर उपसरपंच सचिन ओलेटीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच पुरुषोत्तम येजुलवार,आविस सल्लागार शंकर रंगुवारतिरुपती किर्तीवार,ग्राप सदस्या इंदुताई पेंदाम,ग्राप सदस्या मायाताई आईलवार,नारायण दुर्गा,सतक्रती कुमारी, समय्या येजुलवार,राजन्ना पोरलावार,दादाजी अडगोपुलवार,संदिप येमुलवार,किष्ठाय्या पेंदाम, व्यंकटेश कडार्लावार,आविस सल्लागार माधव कुडमेथे,आलापल्ली माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी उपस्थित खेळाडू व नागरिकांना व्हॉलीबॉल या मैदानी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण व्हॉलीबॉल या सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या कडून तर द्वितीय पुरस्कार आविस सल्लागार शंकर रंगुवार व तिरुपती किर्तीवार तर तृतीय पुरस्कार ग्राम पंचायत कमलापूर यांच्याकडून ठेवण्यात आले. कमलापूर येथील दादा फ्रेंड्स क्लब कडून आयोजित व्हॉलीबॉल सामन्याचे यशस्वीतेसाठी सुदीप रंगुवार,श्लोक आत्राम,राजू उल्लेदला,संस्कार दुर्गे,निवास चालूरकर यांनी परिश्रम घेतले. उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेष्ठ पत्रकार श्रीधर दुग्गीराला यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला कमलापूर गावातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थित होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.