राष्ट्रसंतांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती-अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यतिथी महोत्सव केला जातोय. यासाठी अमरावती जिल्ह्यातील तुकडोजी महाराजाणची कर्मभूमी असलेली गुरुकुंज मोझरी समाधी परिसर रोषणाईने सजविण्यात आला आहे..दरवर्षी लाखो भाविक पुण्यतिथी महोत्सवाला हजेरी लावतात.
मात्र यंदा कोरोनाच सावट असल्याने या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी शासनाच्या नियमानुसार ५० भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला जाणार आहे..५ नोव्हेंबर रोजी ४.५८ मिनिटांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
Comments are closed.