Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीआरपीएफच्या ९ बटालियन द्वारे गणराज्य दिवस व सांस्कृतिक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. २७ जानेवारी : अहेरी येथील सीआरपीएफच्या 9बटालियन मध्ये 72 व्या गणराज्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमांडंट आर एस बाळापूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करून जवानांना अधिकाऱ्यांना तथा त्यांच्या कुटूंबियांना गणराज्य दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

उपस्थित जवानांना संबोधित करताना बाळापूरकर म्हणाले भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी मोठ्या प्रमाणात बलिदानाची आहूती दिली आणि देशाची स्वतंत्रता अबाधित राखण्यासाठी आपल्याला निरंतर प्रयास करण्याची गरज असल्याचे सांगितले देशाची प्रतिष्ठा आणि सुरक्षा जपण्यासाठी संघटीत राहणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रत्येक जवानांनी आपल्या कर्तव्याची जाण ठेवून देशाप्रति प्रामाणिकता ठेवुन देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सीआरपीएफच्या जवानांना राष्ट्रपती द्वारें देण्यात येणाऱ्या विविध पदकांचे वितरण करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या वेळी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सी आर पि फ च्या जवानांनी आपल्या अंगी असलेल्या कौशल्य गुणांचेप्रदर्शन यावेळी केले. जवानांच्या द्वारे प्रदर्शित नृत्य, नाटक, गायन, तबला, बासरी वाद्यांनी उपस्थित जण मंत्रमुग्ध झाले.

या कार्यक्रमाला नऊ बटालियन चे कमांडर आर एस बाळापूरकर अर्चना बाळापूरकर पहिलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग देसाई सौ दिपाली देसाई आल्लापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक तांबे उप कमांडट राकेश श्रीवास्तव, उप कमांडट बीसी रॉय यांची उपस्थिती होती.

Comments are closed.