अहेरी तालुक्यात आ.वि.संचे 15 ग्रामपंचायतीवर सरपंच विराजमान
नागेपल्ली ग्रामपंचायत मध्ये आविस चे वर्चस्व कायम
अहेरी, दि. १५ फेब्रुवारी: आज अहेरी तालुक्यातील सरपंच/उपसरपंच पदाचा निवडीचा कार्यक्रम होता. तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीवर आदिवासी विद्यार्थी संघटनेने आपले पॅनलचे सरपंच निवडून आणत वर्चस्व राखले आहे.
तालुक्यातील महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलापल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर मेश्राम व उपसरपंच पदी भाजपचे विनोद अकंनपल्लीवार विराजमान झाले आहेत. तर नागेपली ग्रामपंचायत वर आदिवासी विद्यार्थी संघटनेने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. सरपंच पदी लक्ष्मण कोडापे तर उपसरपंच पदी रमेश शानगोंडावार विजयी झाले आहेत.
आदिवासी विद्यार्थी संघटनेने तालुक्यातील गोविंदगाव,खमनचेंरू,देचली,पेठा,नागेपल्ली, वेलगुर, मेडपल्ली,पेरमिली, येरमणार, इंदाराम,कुरुमपल्ली, रेपनपल्ली,दामरंचा,मांडरा,कमलापूर या ठिकाणी सरपंच पदावर वर्चस्व राखले असल्याचे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते व जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले आहे.
तर तालुक्यातील देवलमरी ग्रांप च्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मण कन्नाके, उपसरपंच पदी सुरेश गुंडावार, कमलापूर ग्रामपंचायत सरपंच पदी श्रीनिवास पेंदाम उपसरपंच पदी सचिन ओलेटीवार, तिमरम ग्रामपंचायत सरपंच पदी सरोज पेंदाम,उपसरपंच पदी प्रफुल्ल नागुलवार,महागाव(खु)ग्रांप सरपंच पदी रेणुका आत्राम,उपसरपंच पदी उमा मडगुलवार, महागाव (बु)सरपंच पदी पुष्पा मडावी उपसरपंच पदी संजय अलोने, राजपूर (पॅच) ग्रांप सरपंच पदी मीना वेलादी,उपसरपंच पदी कोकीरवार तर बोरी ग्रांप च्या सरपंच पदी शंकर कोडापे उपसरपंच पदी पराग ओलालवार यांची निवड झाली आहे.
Comments are closed.