Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

०८ जुलै ला मुख्यमंत्री यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने काही मार्ग रहदारीसाठी बंद.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 07 जुलै – 8 जुलै ला मुख्यमंत्री यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने काही मार्ग दिनांकरहदारीसाठी बंद गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनाकडुन आवाहन करण्यात येत आहे की, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरीता दिनांक ०८ जुलै २०२३ वार शनिवार रोजी 66 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांचा गडचिरोली दौरा नियोजित आहे.

०८ जुलै रोजी होणाऱ्या दौऱ्याच्या अनुषंगाने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉईंट ते कोर्ट टी-पॉईंट, एम. आय. डी. सी. मार्ग, शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड, मा. जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग दिनांक ०८ जुलै वेळ सकाळी ०६.०० वा. ते सायंकाळी ०६.०० वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. याची सर्व नागरिकांनी दखल घ्यावी व कोणीही या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.