Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर लिंग निवडीस प्रतिबंध कायदाविषयक शिबीराचे आयोजन यशस्वी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 17 एप्रिल : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे समान किमान कार्यक्रमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे, गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर (लिंग निवडीस प्रतिबंध ) कायदा 1994 (pcpndt act) या विषयावर जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे शिबीर घेण्यात आले. या शिबिराला अध्यक्ष म्हणून आर. आर. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तसेच एन. सी. सोरते, 3 रे सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर ) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, गडचिरोली उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, डॉ. सतीश साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. माधुरी किलनाके वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, डॉ. नागदेवते, फिजिशियन, जि. सा. रु. गडचिरोली, डॉ. निळकंठ मसराम रेडिओलॉजिस्ट तथा नोडल ऑफिसर (pcpndt), तेजस राठोड रेडिओलॉजिस्ट, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दिप प्रज्वलनाणे झाली. मान्यवरांनी pcpndt ऍक्ट बद्दल कायदेविषयक माहिती दिली तसेच या कायद्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गरोदर महिला व त्यांचे नातेवाईक, जिल्हा बाल महिला रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी हजर होते. उपस्थित सर्वांना यावेळी तृप्ती राऊत pcpndt समुपदेशक यांनी कायदे विषयक शपथ दिली. कार्यक्रमाचे संचालन प्रतिज्ञा रामटेके, पी. एच. एन. यांनी, तर आभार प्रदर्शन एस. चुधरी यांनी केले. बेकायदेशीर गर्भलिंग निदान किंवा गर्भपात होत असल्यास 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन या शिबिराद्वारे करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.