Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

समता सैनिक दल शाखा अहेरीच्या वतीने शरबत वाटप…!

शरबत वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

अहेरी, दि. १८ एप्रिल: येथील समता सैनिक दलाच्या भीम सैनिकांकडून अहेरी शहरातील मस्जिद समोर मुस्लिम बांधवांना शरबत वाटप करण्यात आले.

रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव आस्थेने रोजा ठेवतात म्हणजेच उपासना करतात. ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक.

महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा करायचा असतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या दिवसाचा महत्त्व समजून अहेरी येथील समता सैनिक दलाच्या भीम सैनिकांनी अहेरी शहरातील मस्जिदांमधे शरबत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत शुभेच्छा दिल्या त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी समता सैनिक दलाच्या भीम सैनिकांचे कौतुक करीत आभार मानले.

हे देखील वाचा :

ज्योती मेश्राम यांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण

 

जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे हस्ते “महिलांसाठीच्या शासकीय योजना” पुस्तिकेचे विमोचन

 

Comments are closed.