Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुणबी सेनेच्या मागण्याना पाठिंबा देत, प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार – खा. राजेंद्र गावित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पालघर प्रतिनिधी 26 जुलै :-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी कुणबी सेनेच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवाय कुणबी सेनेच्या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी आपण राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी राजेंद्र गावित यांनी स्पष्ट केले आहे. खासदार गावित यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात पालघर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत गावित यांनी आश्वासन दिले.

कुणबी सेनेने शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जून २०२२ मध्ये पालघर व वाडा येथे प्रखर आंदोलने करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले. त्यावेळी आंदोलन स्थळी भेट देऊन खा. राजेंद्र गावित यांनी कुणबी सेनेच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला होता. तसेच या आंदोलनाचा तिसरा टप्पा येत्या १३ ऑगस्ट पासून भिवंडी येथून सुरू होणार असल्याने त्याचाही आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात झालेल्या चर्चेत आदिवासी व दुर्गम भागाच्या विकासासाठी प्रलंबित डहाणू ते दिवा (व्हाया विक्रमगड – व्हाया वाडा- अंबाडी, भिवंडी, दिवा) रेल्वे मार्ग तसेच डहाणू – नाशिक रेल्वे मार्ग, जिल्ह्यात बारमाही सिंचन व्यवस्था, राज्य व केंद्र शासनाकडून भात उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा बोनस तसेच, भात शेतीची कामं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करावी या महत्त्वपूर्ण मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खासदार गावित यांना शुभेच्छा देत, राज्यात सत्ता परिवर्तनासाठी श्री. गावित यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांना सदिच्छा व पाठिंबा व्यक्त केला. तसेच कुणबी सेनेच्या मागण्यांना केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील व खासदार श्री. राजेंद्र गावित यांनी पुढाकार घेऊन या प्रलंबित प्रश्नांना संसदेतून चालना द्यावी अशी अपेक्षा श्री. विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी पालघर जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, पालघर तालुकाप्रमुख अरविंद कंडी, वाडा तालुकाप्रमुख प्रल्हाद शिंदे, डहाणू तालुकाप्रमुख जितेंद्र कोरे, पालघर जिल्हा युवादल प्रमुख कल्पेश ठाकरे, तालुका युवादल प्रमुख प्रशांत सातवी, आत्माराम भोईर, विष्णू पाटील, नितीन पाटील, सतीश पष्टे, राजेंद्र पाटील, नरेश घरत, दिपेश पाटील, हार्दिक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :-

https://bit.ly/3BmdqzE

 

Comments are closed.