Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव ग्रामजयंती महोत्सव म्हणून साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि ३० एप्रिल: आपल्या खंजिरी च्या माध्यमातून अखिल विश्वाला मानवतेचा, राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ११२ वा जन्मोत्सव अर्थात ग्रामजयंती महोत्सव त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथील जन्मस्थळी आज पहाटे साडे पाच वाजता ब्रम्हमुहूर्तावर मोजक्याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत हा हृदस्पर्शी सोहळा पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत यावलीत घरोघरी जन्मोत्सव सोहळा अर्थात हा ग्रामजयंती महोत्सव साजरा करण्यात आला. जन्मोत्सवाच्या शुभ पर्वावर तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमित गावकऱ्यांनी पहाटेच ग्रामस्वच्छता केली. दरम्यान तुकडोजी महाराज यांची जन्मभूमीवर देखील आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावली शहीद येथील तुकडोजी महाराज यांच्या जन्मस्थळी पहाटे साडे चार वाजता या जन्मोत्सव सोहळ्याला सुरवात करण्यात आली. एक तास तुकडोजी महाराजांची भजने. तुकडोजी महाराजांच्या जन्मोत्सवावेळी असलेली परिस्थिती मांडण्यात आली. त्यानंतर ठीक पहाटे साडे पाच वाजता तुकडोजी महाराजांचा पाळणा हलला आणि जन्मोत्सव पार पडला. त्यानंतर सामुदायिक ध्यान, प्रार्थना व महाआरती पार पडली. मागील तीन दिवसांपासून यावली शहीद येथे हा ग्रामजयंती महोत्सव सुरु असून आज संध्याकाळी त्याची सांगता होणार आहे.

दरवर्षी ग्रामजयंती ला या गावात प्रत्येक घरासमोर दिव्यांची आरास मांडली जाते आणी रांगोळ्या देखील काढल्या जातात. तोच उत्साह यंदा देखील इथं पाहायला मिळाला. प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि दिव्यांची आरास असल्याने जणू या गावात दिवाळीच असल्यास भास होत होता.

Comments are closed.