Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोनाचाचणी अहवालाला आता क्यूआर कोडचे कवच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती, दि. ३० एप्रिल: कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह याबाबत अनेकांना धास्ती वाटते. अशावेळी पुणे, नागपूर, याठिकाणी कोरोना चाचणी अहवालात मोठा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र अमरावती जिल्ह्यात आता कोरोना चाचणी अहवाल कुणीही खोटा तयार करू शकणार नाही किंवा अशा खोट्या अहवालाद्वारे कुणी कोणाची फसवणूक करू शकणार नाही. याचे कारण म्हणजे आता कोरोनाचाचणी अहवालाला क्यूआर कोडचे कवच चढले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोरोना नमुने चाचणी प्रयोगशाळेने हा महत्त्वाचा प्रयोग यशस्वी केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कोरोना अहवाल प्रमाणपत्रावर दोन क्यूआर कोड टाकण्यात आले आहे. आता या सुरक्षित कोरोना अहवालाचा उपयोग आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचा ठरणार.

डॉ. प्रशांत ठाकरे – कोरोना चाचणी प्रयोगशाळा प्रमुख

सॉफ्टवेअरने केलेले विकसित क्यूआर कोड असणारे कोरोना अहवाल हे आयसीएमारच्या पोर्टलवर जनरेटर होईल. यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. क्यूआर कोड असणारे कोरोना अहवाल प्रमाणपत्र सुरक्षित असून या अहवालात कुठलाही बदल करता येणार नाही. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत २ लाखांवर चाचण्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ४ मे २०२० पासून कोरोना चाचणी प्रयोग शाळेला प्रारंभ झाला. या प्रयोगशाळेला वर्ष होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असला, तरी साडे अकरा महिन्यात २  लाख कोरोना चाचण्या याठिकाणी झाल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.