Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दसरा मेळाव्याचा वाद आता मुंबई हायकोर्टात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 20 सप्टेंबर :- मुंबई महानगरपालिकेने कायदा व सुरक्षेच्या कारणास्तव शिवसेनेला शिवाजी पार्क वर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याचे नाकारले आहे. त्यानंतर शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेणार. महानगरपालिकेने परवानगी नाकारली तर मैदानात घुसू5 मेळावा घेणार अशी र्दपोक्ती शिवसेना नेत्यांनी केली होती. आता या पार्श्वभूमीवर शिवसेनेने  दसरा मेळाव्याचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात नेला आहे.

शिवसेनेने केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. यावर शिवसेना नेते अॅड. अनिल परब  यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शिवपार्कवर मेळावा घेण्यास आम्हाला आडकाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्यायालयाकडून परवानगी मिळेल, असेही परब यांनी सांगितले. या पूर्वीही शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने सात वेळा परवानगी दिली आहे. त्यामुळे याही वेळेला आम्हाला परवानगी मिळेल, असे परब यांनी सांगितले. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचेही परब यांनी सांगितले. दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उद्या उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. सध्या सुरू असलेला प्रकार हा दसरा मेळाव्याला अपशकून करण्याची वृत्ती आहे. १९६६ पासून दसरा मेळावा होत आहे. यामध्ये आडकाठी केली जात आहे. दसरा मेळाव्यासाठी विविध प्रकरणात न्यायालयात सात वेळा आम्हाला परवानगी मिळाली आहे. न्यायालयात उद्या युक्तिवाद होईल. आम्ही दसरा मेळाव्या संदर्भातील सर्व कागदपत्रे वकिलांकडे दिली आहेत. त्यामुळे आम्हाला मेळाव्यासाठी परवानगी मिळेल, असे परब म्हणाले.

मुंबई महापालिकेने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे सांगत शिवसेना, शिंदे गटाला परवानगी नाकारली. त्यावरही परब यांनी टीका केली. संघर्षाच्या ठिणग्या फक्त दादरमध्ये झडतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचा मेळावा आहे. मग, त्याच वांद्रेत ‘मातोश्री’देखील आहे, असे सांगत परब यांनी महापालिकेच्या निर्णयावर टिका केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.