Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला भिकेचे डोहाळे …

मुंबई क्रिकेट असोसिएशनची थकबाकी माफ करावी म्हणून पवारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे, मुंबई क्रिकेट असोसिएशनवर गुन्हा दाखल करावा - अनिल गलगली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20 ऑक्टोबर :-   मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी. त्यामुळे या असोसिएशनवर निवडून येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ असते. प्रत्यक्ष राजकारणात एकमेकांची उणिधुनी काढणारे हे राजकीय नेते ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्या ताब्यात रहावी म्हणून आपले सर्व राजकिय अभिनिवेश बाजूला ठेवून हातमिळवणी करतात. अशा या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला भिकेचे डोहाळे लागले आहेत . म्हणूनच दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मुंबई पोलिसांची असलेली थकबाकी माफ करण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती अत्यन्त धक्कादायक आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठवूनही १४.८२ कोटी थकबाकी भरण्यास तयार नाही. मुंबई पोलिसांनी मालमत्ता जप्त करावी अशी अनिल गलगली यांनी  मागणी केली आहे.

मुंबई पोलिस मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात आणि मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ३० स्मरणपत्रे पाठवूनही १४.८२ कोटी थकबाकी भरण्यास तयार नाही. याबाबत १ सप्टेंबर २०२२ रोजी प्रत्यक्ष पोलीस मुख्यालयात भेट घेऊन थकबाकी न अदा करण्या- या मुंबई क्रिकेट असोसिएशनची मालमत्ता जप्तीची मागणी केली आहे. नुकतेच शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसकडे थकबाकी माफ करण्याची मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला विविध क्रिकेट सामन्यांसाठी दिलेली सुरक्षा आणि त्यासाठी लागणा-या सुरक्षा शुल्काची विषयी माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांकडून माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांनी अनिल गलगली यांना गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३ मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६ चा विश्वचषक टी -20, वर्ष २०१६ मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८ मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप भरलेले नाहीत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या ८ वर्षात केवळ २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही.

मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की अद्याप पर्यंत मुंबई पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनने शुल्क न भरल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्रही लिहिले आहे. अनिल गलगली यांनी वारंवार मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून मुंबई क्रिकेट असोसिएशनने थकबाकी न भरल्याबद्दल एफआयआर नोंदवावी आणि जिल्हाधिकार्‍यांकडून पैसे वसुलीसाठी कार्यवाही करत असोसिएशनची मालमत्ता जप्त करावी, अशी मागणी केली आहे. कोटयावधीची कमाई करणा-या मुंबई क्रिकेट असोसिएशनची थकबाकी माफ करणे आणि तशी मागणी करणे चुकीचे असल्याचे मत गलगली यांचे आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.