Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वकिलाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

नालासोपाऱ्यातील खळबळजनक घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नालासोपारा 28 सप्टेंबर :-  वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नालासोपारा हे एक गजबजलेले शहर आहे. या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते आहे. कायद्याचे रक्षकच काही वेळा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात, आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात. अशीच एक घटना नालासोपारा येथे घडली आहे.

पेशाने वकील असणाऱ्या इसमाने वाहतुकीचा नियम मोडत एका महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी पावणे एक च्या सुमारास घडली. पेशाने वकील असणाऱ्या ब्रिजेश भालेरिया याने नो-पार्किंग मध्ये आपली गाडी उभी केली होती. वाहतुकीच्या नियमाप्रमाणे ती गाडी पोलिसांनी नालासोपारा पश्चिमेला असणाऱ्या पाटणकर पार्क येथे जप्त केलेल्या गाड्यांच्या गोडाऊन मध्ये ठेवली. नियमाप्रमाणे दंड भरून जप्त केलेली गाडी सोडवून नेता येते. परंतु ब्रिजेश भालेरिया याने दंड न भरता थेट गोडाऊन मधून गाडी बाहेर काढली. हे लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांनी गोदाऊनचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तो अडथळा भेदून जात असताना कर्तव्यावर असणाऱ्या महिला वाहतूक पोलीस कर्मचारी प्रज्ञा जळवी यांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रिजेश यांनी त्या महिला वाहतुक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली आणि गाडी दामटविण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या अपघातात महिला वाहतूक पोलीस कर्मचारी प्रज्ञा जळवी या जखमी झाल्या असून त्यांच्या डाव्या पायाला, व उजव्या हाताला दुखापत झाली आहे.त्याना विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोडाऊन मधून गाडी काढताना त्या वकिलाची पत्नी देखील सोबत होती, मात्र ती गाडीवर बसलेली नव्हती. परन्तु पोलिसांनी वकिलाच्या पत्नीवरही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आरोपी वकिलाला अटक करण्यात आली असून पोलिसानी त्यांचेवर भादवि ३०७, ३५३, ५०४ कलमातर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयात आरोपींला हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :- 

Comments are closed.