Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला न्यायालयाची तारीख पे तारीख

पुढील सुनावणी १ नोव्हेंबरला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 28 सप्टेंबर :-  खरी शिवसेना कुणाची ? आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार ? हे पाहण्यासाठी आता १ नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांची धाकधूक वाढली आहे.धनुष्यबाण पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. व आता महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आता थेट १ नोव्हेंबरला होणार आहे.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आमदारांची अपात्रता, राज्यपालांचा निर्णय या याचिकांवर आता १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सत्तासंघर्षावरील सुनावनीला न्यायालयात तारीख पे तारीख सुरुच आहे. शिंदे गटाच्या अर्जावर न्यायालयाने मंगळवारी सकाळी १०. ३० पासून संपूर्ण दिवस सुनावणी घेतली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर शिवसेना पक्ष खरा कोणाचा, या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती नसेल, असा निर्णय न्यायालयाने दिला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी विनंती ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. सर्वोच्च न्यायालयातील मुख्य प्रकरण आता थेट 1 महिन्यांनी लांबणीवर गेले आहे. अपात्रतेची याचिका, इतर मुद्द्यांवर घटनापीठासमोर दिवाळीनंतरच सुनावणी होणार आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर, संतप्त जमावाने ट्रक जाळले.

Comments are closed.