Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस वाहनास धडक देवून जिवघेणा हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी जेरबंद

आरोपीकडुन गुन्ह्रात वापरलेले दोन चारचाकी वाहन करण्यात आले हस्तगत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : गडचिरोली पोलीस पथकास जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करुन शासकिय वाहनास धडक दिल्यावरुन पोस्टे गडचिरोली येथे भारतीय न्यास संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेनंतर लगेचच आरोपी हे गडचिरोली येथुन फरार झाले होते. पोलीसांनी त्यांच्या मागावर राहुन नागपुर येथुन दिनांक 11/10/2024 रोजी सिताबर्डी, नागपुर परीसरातून त्यांना ताब्यात घेवुन अटक केली होती. परंतु, अवैध दारु विक्रेता अजय चिचघरे हा अंधाराचा फायदा घेवुन नागपुर येथुन पळुन जाण्यास यशस्वी झाला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिनांक 12/11/2024 रोजी अजय चिचघरे हा दस­यानिमित्त गडचिरोली येथे येणार असल्याची खात्रिशीर माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन आरोपीस शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली होती. घटनेच्या वेळी आरोपी अजय चिचघरे हा दुस­या चारचाकी वाहनाने दारुच्या वाहनाची पायलटींग करुन, दारुच्या वाहनातील आरोपी नामे गौरव कोडाप व प्रणय पंदीलवार यांच्यासोबत फोनवर संपर्कात होता. फोनवर दिलेल्या सुचनेप्रमाणे आरोपी नामे गौरव कोडाप याने पोलीसांचा जीव घेण्याच्या उद्देशाने पोलीसांच्या वाहनास जोरदार धडक देवुन वाहनाचे मोठे नुकसान केले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर गुन्ह्रातील तिन्ही आरोपी अटक होताच पोलीस पथकाने आरोपींनी धडक देण्याकरीता व दारुच्या वाहतुक करण्याकरीता वापरलेले बोलेरो पिकअप वाहन व मुख्य आरोपीने पायलटींग करीता वापरलेले स्विफ्ट हे चारचाकी वाहन नागपुर येथुन जप्त केले. सदर गुन्ह्रात मा. न्यायालयाने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपीस पोलीस कोठडी सुनावली व आज दिनांक 16/10/2024 रोजी मा. न्यायालयाने आरोपींची दिनांक 29/10/2024 रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजुर केली असल्याने आरोपीतांना चंद्रपुर कारागृह येथे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. भगतसिंग दुलत, स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक, एम. रमेश यांचे मार्गदर्शनाखाली उल्हास भुसारी, भगतसिंग दुलत, सतिष कत्तीवार, प्रेमानंद नंदेश्वर, अकबर पोयाम, राकेश सोनटक्के, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, माणिक दुधबळे, सिकदर, मंडल, शुक्राचारी गवई व उमेश जगदाळे यांनी पार पाडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.