Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपुर 6 डिसेंबर :- भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक भंडारा जिल्हाच्या योगेश वासनिक यांनी, द्वितीय क्रमांक अहमदनगरच्या योगेश कुटे यांनी तर तृतीय क्रमांक चंद्रपूरच्या अश्विनी नंदेश्वर यांनी पटकाविला.

राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा ही भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर दि ०४ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रोत्साहनपर क्रमांक अनुष्का राजू जवाळे, शुभम प्रफुल खोब्रागडे, करिष्मा बाबुराव खोब्रागडे, सुशील बाबुराव दहिवले, अनिकेत जयंतराव देशमुख, स्नेहल संजय ब्राह्मणकर, गौरव पत्रू झाडे, सपना यादव कुनघाटकर, प्रफुल भागवत ढोणे, समर्थ दादाराव कंगाले यांनी प्राप्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल घोषीत करतांना चंद्रपुरातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ. विवेक बांबोळे, डॉ. प्रशिक वाघमारे, डॉ. आम्रपाली खोब्रागडे, सुबोध दुर्योधन, संस्थेचे अध्यक्ष सुरज पी दहागावकर, परीक्षा प्रमुख दिनेश मंडपे आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलय म्हशाखेत्री यांनी केले तर आभार संस्थेच्या सदस्या तृप्ती साव यांनी मानले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विचारज्योत फाऊंडेशन अध्यक्ष सुरज पी दहागावकर, दिनेश मंडपे, तृप्ती साव, डॉ. विवेक बांबोळे, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, मुन्ना तावाडे, प्रलय म्हशाखेत्री, विशाल शेंडे, अनिकेत दुर्गे, नयना घुगुस्कर, सिद्धार्थ दहागावकर, श्याम म्हशाखेत्री, करिष्मा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.