Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारू व तंबाखूमुक्त गावासाठी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण – मुक्तीपथ अभियानातर्फे कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात मुक्तीपथ अभियानातर्फे ९ जुलै रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संवर्ग विकास अधिकारी मुकेश माहोर व उपसंचालक संतोष सावळकर यांच्या उपस्थितीत १३ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दारू व तंबाखूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आला.

कार्यशाळेत दारूबंदी कायदा, तंबाखूबंदी कायद्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. गावात उद्धवणाऱ्या समस्यांवर विचारमंथन करण्यात आले. ग्रामपंचायत दारू व तंबाखूमुक्त राहणे का आवश्यक आहे. निवडणुकीपूर्वी निवडणून येणाऱ्या उमेदवारांनी दारू व तंबाखूमुक्त गावाचे वचन दिले होते. त्याची वचनपूर्ती करणे. कोरोना काळात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकल्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी गावातून तंबाखू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात अवैध दारूविक्री सुरु असल्यास त्यांना नोटीसच्या माध्यमातून दारूविक्री बंद करण्याचे आवाहन करणे. दारूबंदी असून तंबाखूविक्री सुरु असल्यास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद करणे. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद झाल्यास गावाचा विकास होणार. याबाबत उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रशिक्षणामध्ये गोगाव, खरपुंडी, जेप्रा, राजगटा चक, आंबेशिवनी, सावरगाव, मेंढा, बोदली, हिरापूर,विहीरगाव, वाकडी, पुलखल, इंदाळा या १३ ग्रामपंचायतमधील २९ पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

जगातील अनेक देशांमध्ये डेल्टा व्हायरसचं आक्रमण! कोरोनाचं आव्हान संपलेलं नसल्याचा WHO ने दिला इशारा

गडचिरोली जिल्ह्यात आज 11 कोरोनामुक्त तर 5 नवीन कोरोना बाधितांची नोंद

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रत्यक्ष शेतात जावून केली भात रोवणी

 

Comments are closed.