Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन दिवसांपूर्वी पळवून नेलेली बोट दिघी बंदरात सापडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 

वसई, 04 नोव्हेंबर :- वसई तालुक्यातील पाचूबंदर येथून मच्छिमारी करणारी बोट दोन दिवसांपूर्वी पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर या पाचूबंदर येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश गमजा यांनी या बोटीचे मालक डांगर कुटुंबीय आणि त्यांचे भागीदार यांनी वसई सागरी पोलीस स्थानकात बोट पळविल्याची रीतसर तक्रार केली. त्यांनतर वसई सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे सर यांनी मीरा-भाईंदर -वसई – विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपास सुरू केला.

दरम्यान ही बातमी समाज माध्यमाद्वारे सर्वत्र पसरल्यावर सदर बोट ही रायगड येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडल्याचे समजले. मच्छिमार नेते फिलिप मस्कान यांच्या परिचितांपैकी एका व्यक्तीने ही बोट दिघी सागरी पोलिसांना सापडल्याचे कळविले. त्यावेळी बोट पळविलेल्या आरोपीला दिघी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर वसई पोलीस आणि दिघी पोलीस यांनी फिर्यादीकडून खातजमा केल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नवालकर आणि मुंडे यांचे सोबत फिर्यादी बोटीचे मालक डांगर कुटूंबीय त्यांचे भागीदार ,आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश गमजा यांनी रायगड येथील दिघी बंदर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ओळख पटवून बोट ताब्यात घेतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याकामी विशेष परिश्रम घेतलेल्या पोलीस आयुक्त सदानंद दाते साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे साहेब, पोलीस कर्मचारी नलावकर आणि मुंडे यांचे तसेच सामाजिक कार्यकर्ते सतिश गमजा, मच्छिमार नेते फिलिप मस्कान, दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे डांगर कुटूंबियांनी आभार मानले आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.