Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा ! – नारायण राणे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 20 सप्टेंबर :- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगावच्या नेस्को मैदानात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजपला अंगावर घेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई भाजप कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषद घेतला.

या पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे नैराश्यातून केलेले भाषण होते. शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय ? निष्ठावंतांच्या रक्तावर शिवसेना वाढली, उद्धव ठाकरे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा . उद्धव ठाकरे यांनी किती माणसांना घरे दिली? नोकऱ्या दिल्या ? उद्धव ठाकरेंनी जास्त बोलू नये.त्यांचे तोंड आम्ही बंद करू. संजय राऊत यांच्यासारखे उद्धव ठाकरे सुद्धा जेलमध्ये जातील. आमचा कोथळा बाहेर काढताय, आमच्या कडे बघितले तरी आम्ही डोळे बाहेर काढू. अमित शहाना गिधाड म्हणताय, औकात आहे का तुझी . राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आपली पातळी सोडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोदींच्या कामाबद्दल बोलतो, उद्धव ठाकरे मोदींच्या नखाएवढा सुद्धा नाही ? उद्धव ठाकरे संपल्यात जमा आहे. जास्त बोलालं तर तोंड बंद करेन, महाराष्ट्रात फिरू देणार नाही. निवडणुका घेणे ही कुठल्या पक्षाची जबाबदारी नसते, ते सर्व परिस्थिती पाहून निवडणूक आयोग ठरवते.’ ढ’ कुठला. असेही राणे पुढे म्हणाले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.