Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंद्रा मालो, सहसचिव, भारत सरकार यांची घोट येथील अंगणवाडी व बालगृहाला भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 20 सप्टेंबर :-  इंद्रा मालो, सहसचिव, महिला व बाल विकास विभाग, भारत सरकार यांनी चामोर्शी तालुक्यातील घोट येथील अंगणवाडी क्रमांक 5 ला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेष आहार पाककृती व अंगणवाडीबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी सहसचिव यांनी स्वस्थ बालक बालिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक आलेल्या बालकांना पारितोषिक देऊन बालकांचा गौरव केला.

अंगणवाडी सेविकांनी तयार केलेल्या आहार प्रदर्शनीला मालो यांनी भेट देऊन गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष आहार पाककृती बद्दलही माहिती जाणून घेतली. या भेटीत त्यांनी पोषण ट्रॅकर कामकाज आढावा व मार्गदर्शनही केले. या वेळी सहसचिव मालो व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे श्रीमती इंगोले जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा


यानंतर घोट येथील अहिल्यादेवी बाल सुधारगृहाला भेट दिली. इंद्रा मालो, सहसचिव यांनी मुलींशी संवाद साधला व तेथील कार्यालयाची पाहणी केली. यावेळी दोन तासांच्या भेटीत त्यांनी व्यवस्थापनाबाबत कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालकल्याण विभाग व संबंधित कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

हे पण वाचा :-

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.