Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुणे ग्रामीण पोलिसांना अभूतपूर्व यश…

३ कोटी ६० लाख रुपयांचा दरोडा पकडला..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे 1 सप्टेंबर :- पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक जवळ ३ कोटी ६० लाख रुपयांची दरोड्याची रक्कम पळवून घेऊन जात असताना पुणे ग्रामीण च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने दरोडेखोरांना पकडले. पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला हे अभूतपूर्व यश मिळाले असून एकूण ६ दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. अंगाडीया कंपनीच्या वाहनातून ही रक्कम फायरिंग करत लुटली असून पोलिसांनी दरोडेखोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अशी दोन पथके तयार करून ती राजस्थानला पाठविण्यात आली होती. राजस्थान उदयपूर येथील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
या आरोपींमध्ये सागर शिवाजी व्हनमाने, बाळू उर्फ जोतिराम चंद्रकांत कदम(वय ३२ वर्षे , रा. कुर्डुवाडी, ता-माढा, जि-सोलापूर ,रजत अबू मुलांनी(वय -२० वर्षे, रा. न्हावी,ता-इंदापूर यांना ताब्यात घेतले असता त्यांनी इतर साथीदारांच्या गुन्ह्याची कबुली दिली.या गुन्ह्यात असणारे आरोपी अजित भोसले(वय ३३ वर्षे)रा.वेने, ता-माढा, जि-सोलापूर, किरण घाडगे (वय२६ वर्षे) रा-लोणीदेवकर ता-इंदापूर, जि-पुणे, भूषण तोंडे(वय२५वर्षे) रा-लोणी देवकर,ता- इंदापूर, जि-पुणे,यांना अटक करण्यात आली.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जाणून घ्या ओवा खाण्याचे चमत्कारिक फायदे…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वरळी कुणाची ?

Comments are closed.