Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आधारभूत धान खरेदी योजनेचा अॅॅप मध्ये सुधारणा करा.

माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी विकास मंत्री के. सी. पाढवी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कडे मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. १० डिसेंबर : महाराष्ट्र शासनाने हमी भावाच्या धान खरेदी केंद्रावर ज्यांच्याकडे वनजमीनीचे पट्टे आहेत. त्याचे सुध्दा धान खरेदी करण्यात यावे असा निर्णय घेतला आहे. परतु वन हक्क धारकांची खरेदी नावनोंदणी करताना एन.ई.एम.एल.एॅप वन जमिनीचा पट्टाच डाऊन लोड होत नसल्याने अडचन निर्माण झाल्याने अनेक पट्टेधारक शेतकरी वंचित राहण्याच्या स्थितीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या कडे आधारभुत धान खरेदी योजनेच्या एॅप मध्ये सुधारणा करुन द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती .यावरुण माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाढवी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली होती यावर आदिवासी विकास मंत्री के. सि. पाढवी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी वन पट्टे धारक शेतकऱ्यांची दखल घेऊन एन.इ.एम.एल.एॅप मध्ये सुधारणा केले जाईल असे आश्वासन दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ तथा मार्केटींग फेडरेशन यांच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था व खरेदी विक्री सहकारी संस्था यांच्या अंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकरी सह वनजमिन पट्टे धारक केंद्रावर धान विक्री साठी नोंदणी करीत आहेत. परंतु यात सातबारा असलेल्या शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल.एॅपवर आँनलाईन नोंदणी होत आहे यात शासनाने वनजमिनी पट्टे धारकाना खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.परतु वनहक्क पट्टे धारक शेतकऱ्यांची खरेदी नावनोंदणी करताना एन.ई.एम एम.एॅप वन जमीनीचा पट्टा डाऊन लोड होत नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आल्याने शेतकऱ्यांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे धाव घेऊन भेट घेऊन आधारभूत धान खरेदी योजनेच्या वन पट्टे धारक शेतकऱ्यांचा धान विक्री साठी एॅप मध्ये सुधारणा करण्यात यावे अशी मागणी केली होती यात माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासुन कसलेही विलंब न करता राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सि.पाढवी.व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या कडे मागणी केली होती यासंबंधी आदिवासी विकास मंत्री के.सि.पाढवी.व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी लवकरच एन.ई.एम.एल. एॅप मध्ये सुधारणा केली जाईल असे आश्वासन दिले असल्याने माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या प्रयत्नामुळे वन हक्क पट्टे धारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यावेळी काशिनाथ पोटफोडे. दिलीप घोडाम भोलेनाथ धानोरकर, स्वनिल ताडाम. प्रदिप गेडाम रामदास पदा आदि उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.