Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अजूनही वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो – आ. रोहित पवार

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाला अध्याप जागा उपलब्ध नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21, सप्टेंबर :- लोकांना रोजगार मिळून देणारा वेदांतासारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे ही चांगली गोष्ट नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले असून, अद्याप वेदांताला गुजरातमध्ये प्रकल्पासाठी कोणतीही जमीन मिळालेली नाही. तसेच कोणतीही जमीन आवडलेली नाही.

मविआ काळात वेदांताला तळेगाव येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर, त्यांना ती जागा आवडली देखील होती. यासाठी संबंधित कंपनीला अनेक सोयी सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातला गेला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र, जरी हा प्रकल्प गुजरातला गेलेला असला तरी, अद्यापपर्यंत वेदांताला गुजरातमध्ये कोणतीही जमीन पसंतीस पडलेली नाही. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा राज्यात येऊ शकतो, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एक महिला व एक पुरुष जहाल नक्षलवाद्यांनी केले गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण.

Comments are closed.