Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या मनमानी कर्मचाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री शंकर मगडीवार यांचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी १८ ऑगस्ट :अहेरी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अहेरी मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून येथिल कार्यरत असलेल्या कर्मचारी यांची ग्राहकांसोबत होत असलेली वागणूक चुकीची असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरीक त्रस्त झाले असून याकडे सविस्तर लक्ष देण्यात यावे अन्यथा येत्या काळात याचा परिणाम शाखेतील सर्व कर्मचारी राहील असा आरोप सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री शंकर मगडीवार यांनी केला आहे.

शाखेच्या कारभारामुळे अहेरीतिल नागरिक त्रस्त झाले असून दिनांक 17 ऑगस्ट रोजी मंगलवार ला दुपारी जेवनाच्या सुट्टी नंतर नागरिक रांगेत लागून व्यवहार कारित असतांनी कैशियरनी 3.30 वाजले म्हणून झाले काउंटर बंद च्या बोर्ड लाउंन रांगेतील लोकांची हकालपट्टी केली. आणि त्यांनी म्हटले की माझी वेळ झाली तुम्ही उद्या या आज तुमचे मी  काम करणार नाही असे देखील कॅशीअर ने रांगेत उभे असलेल्या लोकांना बोलले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोक बैंक बंद  ह्वायचा वेळेच्या आधीच रांगेत होते. तरी सुद्धा  कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त होऊन, पतसंस्थे कड़े वळू लागले आहे.

मैनेजर ला भेटले असता त्यांनी पन उड़वा उडवि चे उत्तर दिले असून असे व्यवहार ग्राहकांसोबत करीत असाल तर हे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा शंकर मगड़ीवार भा.ज.पा.जिल्हा ओ.बी.सी महामंत्री यांनी दिला आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.