Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात 4 मृत्यूसह 97 नवीन कोरोना बाधित,173 कोरोनामुक्त

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 714 जणांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 29 मे:- आज जिल्हयात 97 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 173 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29237 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27473 वर पोहचली. तसेच सद्या 1050 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 714 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 4 नवीन मृत्यूमध्ये रा.खाकरी ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 43 वर्षीय पुरुष, रा. कोंडाळा ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय पुरुष गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 9397 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.59 टक्के तर मृत्यू दर 2.44 टक्के झाला.
नवीन 97 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 06, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 07, धानोरा तालुक्यातील 03, एटापल्ली तालुक्यातील 11, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 08, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 29, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 08 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 09 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 173 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 34, अहेरी 19, आरमोरी 11, भामरागड 05, चामोर्शी 28, धानोरा 10, एटापल्ली 04, मुलचेरा 20, सिरोंचा 22, कोरची 02, कुरखेडा 03 तसेच वडसा येथील 15 जणांचा समावेश आहे.

Comments are closed.