Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२० वर्षांपासूनची दारूबंदी कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी दिला लढा

विविध उपाययोजना करून विक्रेत्यांना शिकवला धडा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कोरची, 21 मे –  कोरची तालुक्यातील बोटकसा या गावात मागील २० वर्षांपासून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद होती. मात्र, मागील दोन वर्षापूर्वी चोरट्या मार्गाने दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व मुक्तिपथने पोलिस विभागाच्या सहकार्याने दारूबंदी कायम ठेवण्यासाठी लढा दिला. यासाठी विविध उपाययोजना करून विक्रेत्यांना धडा शिकवून अवैध दारूविक्री बंद केली.

बोटकसा गावातील महिला व पुरुषांनी एकत्र येत मागील २० वर्षांपासूनची दारूबंदी कायम टिकवून ठेवली होती. अशातच दोन वर्षांपूर्वी गावातील प्रमुख रस्त्यावर असलेल्या हॉटेलमधून चाय, भजे विक्रीच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दारूविक्री होत असल्याची बाब पुढे आली. जर गावातील दारु विक्री थांबवली नाहीतर पुढील पिढीचे नुकसान होणार हे लक्षात येताच पोलीस पाटील, सरपंच, गाव संघटना, प्रतिष्टीत नागरीक, महीला बचतगट व ग्रामस्थांनी  दारूविक्रेत्यांना नोटीस दिले. दारु विक्रेत्यांच्या घरी भेट घेउन दारु पकडली, दारु विक्रेत्यांची यादी तयार करुन पोलिस निरीक्षकांना सादर केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पोलिसांनी धाड टाकून सहा विक्रेत्यांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला. तरीसुद्धा मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. दरम्यान, मुक्तिपथ चे तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी ग्रामस्थांची सभा घेऊन अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार हॉटेलच्या नावाखाली दारु विक्री करणाऱ्यांविरोधात ऑगस्ट २०२१ मध्ये अहिंसक कृती करुन विक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवला. तेव्हापासून गाव दारूविक्रीमुक्त झाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आता दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही दारूबंदी कायम आहे. या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी नुकताच गावाने विजयस्तंभ उभारला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन गाव संघटना अध्यक्ष गोविंद नरोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच किशोर नरोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील मनोज बेलवाती, शंकर जेठुमल, प्रभा भारतसागर, मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके, मुख्याध्यापक नागपुरे, डॉ.चौधरी, डॉ. विनोद भैसाछान, डॉ.मुर्ली जेठुमल, चंदनखेडे, नरेश भैसाछान, दलीराम भानारकर, मोतीराम मडावी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार भगवंतराव विद्यालयाचे मस्के यांनी मानले.

Comments are closed.