Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर- शरद पवार

जयंत पाटील यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे,  22 मे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला गेला आहे. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 बड्या नेत्यांची चौकशी केली. त्यापैकी काही नेत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. तर, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. “सध्याच्या शासनाकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 10 बड्या नेत्यांची चौकशी किंवा काही नाकाही कामासाठी चौकशीसाठी बोलण्यात आले होते. त्यामधील काही लोकांवर कारवाई करण्यात आली आहे”, असे शरद पवार म्हणाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“अनिल देशमुख यांना जवळपास 13 ते 14 महिने तुरुंगात ठेवलं. त्यांच्यावर एका शैक्षणिक संस्थेसाठी 100 कोटी रुपये घेतले, असा आरोप करण्यात आला होता. सतत चौकशीनंतर आरोप पत्र जे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये 100 कोटींची रक्कम ही 20 कोटी रुपयांवर आली. याचा अर्थ ते अतिरंजीत अशा प्रकारचे आरोप केले जातात. लोकांच्या समोर सुरूवातीला 100 कोटींचे आरोप गेले. त्यामुळे लोकांना धक्का बसला होता. त्यांची बदनामी करण्याचे काम त्यांनी केली”, असे शरद पवार म्हणाले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.