Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काळवीटच्या पाडसाला गावकऱ्यानी दिले जीवदान

भंडारा तालुक्यातील पांढराबोडी शेत शिवारातील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा 16 जुलै :-  संततधार पावसाचा फटका वन्य प्राण्यांना देखील जाणवू लागला असून भंडारा येथून जवळच असलेल्या पांढराबोडी येथील प्यारेलाल वाघमारे यांच्या शेत रोवणी करणाऱ्या महिलांना हरणाचा पाडस पळसाच्या झुडपात ओल्या चिंब असवस्थेत दिसला. सततच्या पावसामुळे कुळकुळत असलेल्या अवस्थेत असतांना काहींनी त्या पिल्याला उचलून पाहिले. तो पाडस जिवंत असल्याचे आढळले. वेळीच गावातील युवा कार्यकर्ते स्थळावर पोहचले. व सर्वांना बाजूला सारून त्या पाडसाला हातात घेऊन थंडीने कुळकुळत असलेल्या पिल्याला संपूर्ण शरीर पुसून काढले व त्याला मायेची उब दिली. त्याचवेळी वन विभागाला याची माहिती देण्यात आली .

हरणाचा पाडसावर देखरेख ठेवत असलेला कळप बाजूला अंदाजे २५ फुटावर पिल्याला सोडून दिले. पाडस काही अंतरावर गेल्यावर थांबले व बाय बाय केल्यावरच आईच्या दिशेने पळाला. आई पिल्याला वाट दाखवत कळपाच्या दिशेने घेऊन गेली. आई व मुलाचे मिलन पाहून सर्वांचे डोळे पानावले होते. तो क्षण आश्चर्यजनक होता. आईने त्या पिल्याला सोबत जंगलाचा दिशेने घेऊन गेली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :- धक्कादायक: महाराष्ट्रात १७ महिन्यांत तब्ब्ल २२ हजार ७५१ बालमृत्यू. https://loksparsh.com/top-news/information-comes-out-in-rti-by-samarthan-of-highest-child-deaths-in-maharashtra-state/27615/

गडचिरोलीत महा भयावह विदारक पूरस्थिती ….

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.