Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवउद्योजक व्हायचं आहे? पर्याय गोंडवाना विद्यापीठाचे ट्रायसेफ इंक्युबेशन सेंटर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 17 ऑगस्ट 2023 : सक्षम स्वावलंबी विद्यार्थी घडविणे ही प्रत्येक विद्यापीठाची प्राथमिकता असते. गोडवाना विद्यापीठ गडचिरोली देखील यास अपवाद नाही चंद्रपूर गडचिरोली जिल्हयाची भौगोलिक परिस्थीती, आदिवासी बहुल भाग व्यावसायिक संसाधनांची कमतरता, नक्षल प्रभावित क्षेत्र इत्यादी कारणांमुळे या जिल्हयातील विकासाचा वेग इतर जिह्यापेक्षा कमी आहे. याचा थेट प्रभाव जाणवतो तेथील युवा पिढीच्या प्रगतीवर ही दरी भरून काढण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आणि विद्यापीठात ट्राइबटेक कम्युनिटी इंटरप्रेनरशिप फाउंडेशन (ट्रायसेफ) या कंपनीची कलम ८ अंतर्गत ३० डिसेंबर, २०२२ रोजी स्थापना झालेली आहे.

नवउद्योजक वाढीसाठी चालना देणे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केवळ नोकरीवर अवलंबून न राहता युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावा, युवकांना स्वावलंबी होता यावे यासाठी गोंडवाना विद्यापीठ संचलित ट्रायसेफ चे कार्य सुरु झालेले आहे. यात समाज व व्यवसाय यांची सांगड घालून व्यवसाय नवोन्मेषास प्रोत्साहित करण्याचे कार्य केले जाते. जेणेकरुन ते यशस्वी उद्योजक होऊ शकतील. त्याकरीता त्यांना जागा, भांडवल आणि मार्गदर्शन पुरविण्याचे काम केले जाते. विद्यापीठाच्या चंद्रपूर गडचिरोली कार्यक्षेत्रातील कुठल्याही शैक्षणिक पार्श्वभूमीवर नागरिकांच्या व्यवसायास चालना देण्यासाठी हा मंच उत्सुक आहे विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच अध्यापकांतील सर्जनशिलता व नवोन्मेष यांस प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.

कोण घेऊ शकत ट्रायसेफ केंद्राचा लाभ

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

व्यवसाय संदर्भातील देणगी व अनुदान मिळविण्यास व त्यांचा लेखाजोखा ठेवण्यास मदत करणे विविध विद्यापीठ तसंच संशोधन संस्थांशी संपर्क ठेऊन त्यांच्याशी संलग्न होण्यास मदत करणे गौण वन उपज, बांबू, जलचर, पर्यटन, शेती, पारंपरिक औषधी, ड्रोन, पंचगव्य अशा विविध क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या नवोन्मेषास प्रोत्साहन देण्याचे कार्य ट्रायसेफ तर्फ करण्यात येते, तसेच गोंडवाना विद्यापीठ द्वारे संचलित ट्रायसेफ केन्द्र युवाकांना आत्मनिर्भर बनवित या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा हातभार लावत आहे.

याकरीता स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी विद्यापीठ पीरक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील सर्व इच्छुक आजी – माजी विद्यार्थानी युवकांनी व नागरीकांनी ट्रायसेफ केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन ट्रायसेफ केंद्राचे संचालक डॉ. अनिल चीताडे तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी धीरजसिंग चंदेल यांनी केले आहे.

हे पण वाचा :-

Comments are closed.