Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती, दोन शेतकरी आत्महत्यांनी हादरले वर्धा

छतावर चढत दोरी बांधून घेतला एकाने गळफास तर दुसऱ्या घटनेत चक्क जिवंत विजतार तोंडात घेऊन संपविले जीवन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वर्धा 18 ऑगस्ट :-  वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे पेरले ते उगवले पण अतिवृष्टीमूळे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरच उगवलेले पिकच पाण्यात बुडाले. त्यामुळे वर्ध्यात निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. भिवापूर येथील शेतकऱ्याने रात्री छतावर चढून सळखीला दोरखंड बांधला आणि गडफास घेत छतावरून उडी मारली आहे तर दुसऱ्या घटनेत वर्धा तालुक्यातील पडेगाव येथे शेतकऱ्याने चक्क जिवंत विजतार तोंडात घेऊन स्वतःचे आयुष्य संपविले आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी याच भागात दौरा करून पाहणी केली होती. शेतकऱ्यांशी चर्चा देखील करण्यात आली होती.

भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने पडेगाव येथे थेट जीवंत विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे पुढे आले आहे. गणेश श्रावण माडेकर (३६) रा. पढेगाव असे मृत्यूस कवटाळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत भिवापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीला शेतकरी पाहू शकला नाही. झालेले नुकसान मिळणाऱ्या मदतीने देखील भरून निघणारे नसल्याने भिवापूर च्या सत्तर वर्षीय अजाबराव घोंगे या शेतकऱ्याने आपल्या घराच्या छतावर चढून स्वतःच गळफास लावून घेतलाय. शेतकऱ्याच्या या आत्महत्येमुळे जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील न्यायाधीशांची संवेदनशीलता

गर्भवती महिलेची आरोग्य केंद्राच्या दारात प्रसुती, अर्भकाचा मृत्यू

Comments are closed.