Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय”- आदित्य ठाकरे

५० थर नाही, ५० खोके लावलेत आणि जनतेचं सरकार पाडलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

जळगाव 18 ऑगस्ट :-  “काल आपले बॅनर कोणी तरी फाडले होते, अश्या चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका. मी आज त्यांचा मुखवटा फाडायला आलोय.” असं म्हणत शिव संवाद यात्रेसाठी जळगावात लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांचे बॅनर फडणाऱ्या नतदृष्टांवर आदित्य ठाकरे यांनी निशाण साधलाय.

राज्यात सुरू असलेलं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला मान्य आहे का ? तुमच्या आमदारांची गद्दारी केली ते तुम्हाला मान्य आहे का ? हेच तुम्हाला विचारायला आलोय, सांगायला आलोय. असं म्हणत शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जळगावात शिवसैनिक आणि नागरिकांना संबोधित केलं. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा सुरू आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी बोलताना ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राचं सरकार पाडून गुवाहाटीला जिथे ओला दुष्काळ होता, तिथे तुम्ही मजा मारत होता. ४० जण गद्दारी करून गेले, ते स्वतःसाठी गेले, जनतेसाठी नाही. ५० थर लावले बोलतायात, ५० थर नाही ५० खोके लावलेत तुम्ही, एवढे खोके म्हणतात पण लोकांमध्ये ते आले का? नवीन काही घडलंय का? जनतेसाठी काही आलंय का? गेलेल्यांना काय मिळालं?  उलट आधी चांगली खाती तरी होती. तुमच्या माथ्यावर गद्दारीच कलंक कायम राहणार . महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती, दोन शेतकरी आत्महत्यांनी हादरले वर्धा

Comments are closed.