Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वाडा तालुक्यातील कातकरी लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वितरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाडा 18 ऑगस्ट :-  गेले अनेक दिवस वाडा तालुक्यातील कातकरी बांधव जातीच्या दाखल्यांपासून वंचित होते. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. अखेर या कातकरी बांधवाना जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्याचा मुहूर्त प्रशासनाला सापडला. १९ ऑगस्ट रोजी पालघरचे जिल्हाधिकारी वाडा तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना वाडा तहसीलदार कार्यालयात कातकरी लाभार्थ्यांना जातीच्या दाखल्यांचे वितरण जिल्हाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

कातकरी हा समाज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही अनेक बाबतीत मागासलेला असून उपेक्षितांचे जीवन जगत आहे. अनेक कुटुंबाकडे जातीचे दाखले नाहीत. रेशनकार्ड, आधारकार्ड नाहीत त्यामुळे त्यांना सरकारी ओळख नाही. बेरोजगारी, स्थलांतर, कुपोषण असे मोठे प्रश्न ह्या समाजात आहेत. सध्याच्या स्थितीत ‘ आदिम जमाती विकास कार्यक्रम’ ही योजना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तसेच स्थानिक प्रकल्पाधिकारी ह्यांच्या माध्यमाने या समाजातील लाभार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याच संकल्पनेच्या माध्यमातून वाडा येथे जिल्हाधिकारी पालघर यांच्या उपस्थितीत कातकरी लाभार्थ्यांना जातीचे दाखले वितरण करण्यात आले. यावेळी वाडा उपविभागीय अधिकारी भगवान आगे पाटील, वाडा तहसीलदार उद्धव कदम, नायब तहसीलदार सुनील लहांगे, दिलीप काळे, वाडा क्षेत्र समन्वयक रवींद्र भुरकुंडे, आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“चिंदी चोरांकडे लक्ष देऊ नका, मी त्यांचा मुखवटा फाडायला आलोय”- आदित्य ठाकरे

Comments are closed.