Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा गांधीजींची कर्मभूमी असलेला वर्धा, गडचिरोली जिल्हा मद्यव्यसनात आघाडीवर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 22, सप्टेंबर :- राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. राज्याचा महसूल वाढवा म्हणून ऐन कोरोना काळात राज्य सरकारने मद्य विक्री वरील बंधन उठवले होते. आता राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवाल प्रसिद्ध झाल्यावर जिल्हावार मद्य व्यसनाचे प्रमाण महिला, पुरुष आणि तरुणांमध्ये कशा प्रमाणात आहे हे आता उघड झाले आहे. या अहवालानुसार, तरुणी व महिलांच्या मद्यव्यसनामध्ये राज्यात धुळे जिल्हा (३८.२ टक्के) तर पुरुषांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा (३४.७ टक्के) प्रथम क्रमांक लागतो. राज्यात मद्यव्यसनात महिलांचे प्रमाण ०.४ टक्के तर पुरुषांचे १३.९ टक्के आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रमाणात मद्य प्राशन केले जाते. राज्यात दारू पिणाऱ्या महिलांमध्ये धुळ्यानंतर गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानी असून यानंतर नंदुरबार व पालघर या जिल्ह्याचा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये गडचिरोलीनंतर भंडारा, वर्धा व गोंदिया या विदर्भातीलच तीन जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असूनही तिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे.

मद्यपानामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत असून अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु, मद्यविक्रीतून येणारा महसूल बघता राज्य आणि केंद्र सरकारच मद्य विक्रीला प्रोत्साहन देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढली असून सर्वाधिक मद्यपी महिला धुळे जिल्ह्यात तर पुरुष  गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ही धक्कादायक माहिती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य अहवालातून समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यात १६ ते ३५ वयातील तरुणांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.  दारू आणि हुक्का पिणाऱ्यांमध्ये तरुणींचेही प्रमाण सर्वाधिक असून ग्रामीणच्या तुलनेत शहरातील मुलींना दारूच्या व्यसन जास्त आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Comments are closed.