Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासदार गजानन कीर्तिकर यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 22 सप्टेंबर :-  काल शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथे शिवसेनेच्या गतप्रमुखांचा जाहीर मेळावा घेतला होता. या मेळावा सभेच्या अगोदर प्रसार माध्यमानी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांना गाठले आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

खासदार गजानन कीर्तिकर असे म्हणाले की, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी आघाडी करू नये. त्यामुळेच पक्षाचे आमदार शिवसेनेला सोडून गेले. एकवेळ भाजपाशी युती नाही केली तरी चालेल.आपण एकटे लढू, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शी आघाडी करू नये असे ठाम मत कीर्तिकर यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले. त्यामुळे कीर्तिकर शिंदें गटात जाणार का अशी एक चर्चा आता सुरू झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यात कीर्तिकर यांची त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी देखील केली होती. या सर्व घटनेनंतर कीर्तिकर शिंदे गटात सामील होणार का ? या चर्चेला आता उधाण आले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.