Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत : ऋतुजा लटके 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई 12 ऑक्टोबर :-  ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चाही सुरु झाली होती. यावर आता ऋतुजा लटके यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. सोबत त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फेसबूक पोस्टमुळे त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मी एकनिष्ठ आहे, मी अंधेरीची पोटनिवडणूक लढती तर ती मशाल या चिन्हावरच लढेन, असंही त्यांनी म्हटलं.

हे पण वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.