Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संजय राऊत मीडियाशी बोलले तर आपल्याला नेमकी काय अडचण आहे?

कोर्टाने दिल्या ईडीला कानपिचक्या 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 21 ऑक्टोबर :-  आज खा.संजय राऊत यांच्या जामिनावर कोर्टात सुनावणी होती. मात्र, ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागून घेतल्यामुळे यावेळी राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच जाणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतात, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असा सवाल आज कोर्टाने ईडीला विचारला. तुमच्याच म्हणण्यानुसार ही राजकीय केस नाही, मग राऊत लोकप्रतिनिधी आहेत, ते जर कोर्टाबाहेर मीडियाशी बोलले तर आपल्याला नेमकी काय अडचण आहे? अशी विचारणा कोर्टाने ईडीला केली. राऊत सुनावणीसाठी कोर्टात येताना बाहेर उभे असलेल्या माध्यमकर्मींशी बोलतात, अशी तक्रार ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर कोर्टाने आज ईडीला झापले.

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी स्थगित केली. सरते शेवटी राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १५ दिवसांची वाढ झालेली असून त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. कारण पुढचा आठवडा दिवाळीमुळे कोर्टाचं नियमित कामकाज बंद असेल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

कारमध्ये फुग्यांचा स्फोट : चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

TICCI च्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उद्योग उभारणीला बळकटी मिळणार

Comments are closed.