भीमजयंती साजरी केली म्हणून नांदेड मधील अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या करणाऱ्या जातीवादी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई 4 जून- नांदेड मधील बोनडार गावात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून निर्दोष भीमसैनिक अक्षय भालेराव यांची निर्घृण हत्या करणाऱ्या जातीवादी मानसिकतेच्या निर्दयी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे. भीमसैनिक अक्षय भालेराव यांच्या हत्येचा आणि बोनडार गावातील दलित वस्तीवर झालेल्या हल्ल्याचा रिपब्लिकन पक्षातर्फे आपण तीव्र निषेध करीत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले आहे.
फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृण हत्या केली जाते ही निंदनीय आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना आहे. या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो असे ना.रामदास आठवले यांनी आपल्या तीव्र भावना काळविल्या आहेत.
दिवंगत अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांपैकी 7 जणांना अटक झाली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. दिवंगत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत तात्काळ द्यावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देऊन कुटुंबाचे पूनर्वसन करावे.अक्षय भालेराव खून प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी जेणे करून पुन्हा असा गुन्हा कोणी करू नये असा कायद्याचा धाक निर्माण होईल अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
हे पण वाचा :-
Comments are closed.