Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘आपली कन्या, आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिला पोलिसांनी दिली ग्राम भेट

भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात’आपली कन्या, आपल्या दारी’या उपक्रमांतर्गत महिला पोलिसांनी गुंडेनुर गावाला भेट देऊन शासकीय माहितीची केली जनजागृती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २१ मार्च: राज्यातील शेवटच्या टोकावर असलेला भामरागड तालुका म्हटल तर सर्वाना परिचित आहे. तेही फक्त नक्षलवाद आणि निसर्गाने नटलेल वेड्या वाकड्या नदीने वेढलेले त्रिवेणी संगम असलेले ठिकाणी असून एवढेच काय निसर्गाने या ठीकाणी डोंगर दर्या, धबधबाने आकर्षित करणारे शेवटचे ठिकाण आहे. भामरागड तालुका आजही विकासापासून कोसो दूर आहे. आजही या भागात नक्षल्यांच्या कारवाई सुरूच असतात. त्यामुळे रोड, रस्ते, वीज या आजही पोहचू शकले नसले तरी गडचिरोली पोलिसांनी जसाच तसे उत्तर देऊन विकासाची कास धरू लागली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नक्षली कृत्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही दहशतीत असले तरी पोलीस विभागाच्या मदतीने लोकशाही मार्गाने विकासाला गती देतांना दिसत आहेत. नक्षल्यांचा दडपशाही विरोधात आवाज उचलत असून पोलिसांच्या मदतीने शासकीय योजनेचा फायदा घेत आहेत. गडचिरोली पोलीसही नक्षल्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. तर नक्षलग्रस्त भागातील जनतेलाही विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत आहेत. आजही भामरागड तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या लाहेरी उप पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावे आहेत त्यापैकी नदी, नाल्यांनी घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या गुंडेनुर या गावी चक्क महिला पोलीसांनी जनजागृती करण्यासाठी ‘आपली कन्या, आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला.

या गुंडेनुर गावात दारिद्र्य, निरक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. त्याच निरक्षराचा फायदा घेऊन नक्षली खोट्या भूलथापा देऊन आपल्याकडे ओढून घेतात. चुकीची माहिती सांगतात आणि त्यानंतर आपल्या अडचणीत भर घालतांना दिसून येते. हीच अडचण ओळखून महिला पोलिसांनी मोठ्या धाडसानी ‘आपली कन्या, आपल्या दारी’ उपक्रम राबविला. म्हणतात ना, “एक आई शिकलेली, घर पुढे नेई” हि म्हण महिला पोलिसांनी गावाच्या भेटीत दाखवून दिली. दुर्गम भागातील महिलांना सुशिक्षित करून विकास करण्यासाठी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांचे पुढाकाराने उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे सुरू करण्यात आलेल्या ‘आपली कन्या, आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत उप पोलीस स्टेशन लाहेरीच्या गुंडेनूर गावास भेट दिली.    

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या भेटीदरम्यान ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली व उपस्थितांना महिला पोलीस शिपाई शोभा गोदारी, सोनम लांजेवार, सोनाली नैताम यांनी महिलांकरिता शासन राबवत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची विस्तृत माहिती दिली तसेच महिला संबंधीच्या विविध कायद्यांबाबतही माहिती दिली. त्याचबरोबर खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात आले. तसेच यावेळी सर्वांना खाऊचे ही वाटप करण्यात आले. महिलांची उपस्थिती व स्पर्धेतील सहभाग यावरून त्यांचा शासनाबद्दल असलेला विश्वास यावेळी निदर्शनास आला. विशेष म्हणजे २० मार्च हा संयुक्त राष्ट्रद्वारे आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यातून आनंदी राहण्याचा संदेश जगभर दिला जातो. परंतु यापासून अनभिज्ञ असलेल्या या गावकरी महिलांना लाहेरी येथील महिला पोलीस पाहून जणू आपलीच मुलगी आपल्या भेटीला आल्याचा आनंद झाला.

यावेळी अभियान दलाचे नेतृत्व प्रभारी अधिकारी अविनाश गोळेगावकर, ३७ बटालियन चे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले, शीतलाप्रसाद, पोलीस उप निरीक्षक विजय सपकाळ,  महादेव भालेराव आदींनी केले.

Comments are closed.