Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाविकासआघाडी सरकारचा भाजपातर्फे गडचिरोलीत जाहीर निषेध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २१ मार्च: गडचिरोली येथील गांधी चौक येथे आज भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली चे वतीने गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी भाजप जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्ष जिल्हा गडचिरोली चे वतीने राज्यातील माहाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राच्या आधारे दर महिन्याला शंभर कोटी रुपयांचा वसुली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे व हा प्रकार महाराष्ट्र राज्याचा सन्मान हणन करण्याचा प्रकार आहे व दिवसेंदिवस मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर होत असलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे व गृहमंत्री अनिल देशमुख सारख्या जबाबदार मंत्रीवर पोलीस आयुक्त यांनी आरोप करने म्हणजे लाजिरवाणा प्रकार आहे या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा यासाठी निषेध व्यक्त करून भारतीय जनता पक्षाचे वतीने गडचिरोली शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.

आज या आंदोलनाने व महावीकास आघाडी सरकार विरोधातील नारेबाजीने संपूर्ण गडचिरोली शहर दुमदुमले यावेळी उपस्थितांना खा. अशोक भाऊ नेते व आमदार डॉ. होळी यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रामुख्याने गडचिरोली नगर परिषद अध्यक्षा सौ योगिता ताई पिपरे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रणजिता कोडापे, भाजप जिल्हा महामंत्री गोविन्द सारडा, प्रमोद पिपरे, रवी भाऊ ओल्लालवार, प्रशांत वाघरे, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य रमेश भुरसे, भाजपा उपाध्यक्ष भारत खटी, आदिवासी आघाडी प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख अनिल पोहनकर, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, यू,मो, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, ज्येष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका अल्का ताई पोहनकर, भाजप नेते सरपंच भास्कर बुरे, युवा नेते सागर कुंभरे, हर्षल भाऊ गेडाम महिला आघाडी नेत्या नीलिमा राऊत, ज्योती बागडे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.