Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतरराष्ट्रीय वन दिन: वनसंरक्षणासोबतच वनसंवर्धन ही काळाची गरज- डॉ. किशोर मानकर

आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्य गडचिरोली वनवृत्तात कोविड-१९ चे नियम पाळून केले जनतेत जनजागृती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्य संपादक – ओमप्रकाश चुनारकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन अत्यंत जागरूकतेने स्वतंत्र आज्ञापत्र काढून वृक्षतोड करण्यावर सक्त बंदी घातली होती. परंतु कालांतराने मात्र आपण वनांचे महत्व जाणून घेण्यात व त्यांचे संवर्धन करण्यामध्ये कुठे तरी कमी पडलोत अशी भावना व्यक्त करीत होते.  सुमारे साडेचारशे वर्षापूर्वी संत श्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांनी वृक्षाविषयी आपल्या मनातील भावना व्यक्त करतांना वृक्षांना सोयरे म्हणून संबोधले आहे. त्याच राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या हृदयामध्ये आपले स्थान निश्चित केलेल्या लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च” हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये युरोपियन काॅनफीडरेषण ऑफ अग्रीकॅल्चरच्या २३ व्या बैठकीपासून हा दिन साजरा करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली, दि. २१ मार्च: आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात येतो. या अंतर्गत विविध प्रकारच्या वनांचे संरक्षण व संवर्धन, वन्य जीवाचे महत्व, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी वनवृत्त अंतर्गत येणाऱ्या गडचिरोली, वडसा, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड या पाच वनविभाग आणि वनपरिक्षेत्र कार्यालया मार्फत जिल्हाभरात जागतिक वन दिनानिमित्य वनाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी वनाधिकाऱ्यांना ठिकठिकाणी विविध उपक्रम व जनजागृती करण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाचही वन विभागात विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला.

गडचिरोली वनसंरक्षक कार्यालयात वन संवर्धनाबाबत वनवसाहत मध्ये असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वनसंरक्षक कार्यालयातील इमारतीमध्ये वनसंवर्धनाचे महत्व विषद करण्यात आले. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १० पर्यंतच्या उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमार्फत प्रश्नमंजुषा कार्यक्रम राबवून वनसंवर्धन करण्यासाठी शपथ देण्यात आली.

जिल्हाभरात ठिकठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी मोटार सायकल रॅलीद्वारे वन संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्य वन विभागाच्या वाहनाद्वारे प्रचार, प्रसार करण्यासाठी फलक व बॅनर लावून प्रसिद्धी करण्यात आली.

कोविड-१९ च्या प्रादुर्भाव असल्याने सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरानाचे काटेकोर नियमाचे पालन करण्यात आले. यावेळी गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ कुमार स्वामी, उपवनसंरक्षक गडचिरोली, चंद्रकांत तांबे, उपवनसंरक्षक आलापल्ली, आशीष पांड़े उपवनसंरक्षक भामरागड, सुमित कुमार उपवनसंरक्षक सिरोंचा, श्री. विवरेकर उपवनसंरक्षक वडसा वनविभागाच्या वनाधिकाऱ्या अंतर्गत सर्व वनपरीक्षेत्र कार्यालयात आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधून गडचिरोली वन विभागातील गुरवळा उपवनक्षेत्रातील शेतकऱ्यांना कार्यालयात पिक नुकसानीचे धनादेश वाटप करण्यात आले तर सेमाना उद्यान या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना विविध जातीचे रोप वाटप करण्यात आले.

याशिवाय उन्हाळ्याची चाहूल लागली असल्याने पशु पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली. वन आणि वन्यजीवाचे महत्व कळावे यासाठी गडचिरोली वनविभागातील गुरवळा उपवनक्षेत्रात विद्यार्थ्यांसोबत वनभ्रमंती आयोजित  करण्यात आली. यासोबतच स्थानिक लाभार्थ्यांना गॅसचे वितरण करण्यात आले. 

आलापल्ली वन विभागाच्या वनसंपदा कार्यालयात वनसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वनरक्षक व वनपाल यांना उपवनसंरक्षक सी.आर.तांबे यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे,चंद्रशेखर तोम्बर्लावार आदी उपस्थित होते.

याशिवाय आलापल्ली येथील जैवविविधता उद्यानात सकाळी  फिरायला येणाऱ्या नागरिकांना गुलमोहर, सीताफळ, करंज रोपांचे वाटप करण्यात आले. आशीर्वाद वसतिगृह नागेपल्ली येथे विद्यार्थ्यांना वन व वन्यप्राणी संरक्षण व संवर्धनाचे महत्व पटवून देण्यात आले. झाडांची अवैध पणे तोड टाळा,वृक्षारोपन करून त्याचे संवर्धन, अतिक्रमण टाळणे,जंगलात लागणाऱ्या वन वनव्याला आळा घालणे इ. विषयावर जनजागृती करण्यात आली.

जागतिक वनदिनानिमित्य वनाचे संवर्धन करण्यासाठी जिल्हाभरात सर्व वनाधिकाऱ्यांनी, वनकर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून जनजागृती करून मोलाचा सहभाग नोंदवून गाव खेड्यात संदेश देण्यात आलेला आहे. जिल्हाभरात नक्कीच स्थानिक नागरिक वनाचे संवर्धन, संरक्षण करून वनविभागाला सहकार्य करतील.

डॉ. किशोर मानकर, मुख्य वनसंरक्षक गडचिरोली वनवृत गड़चिरोली
Dr. Kishor Mankar CCF Gadchiroli


Comments are closed.