Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रामनवमीच्या दिवशी मोठी घटना, मंदिरात पूजा सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत

मध्य प्रदेशातील इंदूरमधल्या पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर धक्कादायक घटना समोर आली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

इंदौर, मध्य प्रदेश 30, मार्च :-  देशभरात आज रामनवमीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्री बेलेश्वर महादेव झूलेला मंदिरातील बावडीवर असलेलं छत कोसळलं आहे. आतापर्यंत चार जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इंदूरमधील स्नेह नगरजवळ असलेल्या पेटल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिर आहे. रामनवमीनिमित्त या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थिती लावली होती. याच वेळेच येथील विहिरीवर बांधलेला स्लॅब कोसळला. त्यामुळे या स्लॅबवर उभे असलेले 25 लोक विहिरीमध्ये पडले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक पोलिसही घटनास्थळी आहेत. याचप्रमाणे फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आलं असून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

50 फूट खोल विहीर

ही विहीर ५० फूट खोल होती. राम नवमीच्या उत्सवासाठी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. या विहिरीवर २० ते २५ जण उभे होते. अचानक हे झाकण ढासळल्याने सगळेच लोक थेट पाण्यात कोसळले. या भाविकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरु आहे.१० वर्षांपूर्वीच विहिरीवर हे झाकण तयार करण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेत किती जण विहिरीत पडले, याचा निश्चित आकडा समोर आला नाही. मात्र आतापर्यंत ५-६ जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु असून बचावलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल केलं जातंय.

 

 

Comments are closed.