Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“त्या मुजोर” वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यामुळे राम भक्तांविरुद्ध पोलिस तक्रारीने आलापल्लीत नवा वाद

विनापरवाना काष्टपूजन करून शोभायात्रा काढल्याचा आरोप..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रवीकुमार मंडावार 

आलापल्ली येथील सागवानाची जगभर ख्याती आहे. अयोध्येत होऊ घातलेल्या राममंदिरासाठी आलापल्लीचे सागवान मागविले आहे. या सागवानापासून राममंदिराचे प्रवेशद्वार, गर्भगृहाची शोभा वाढणार आहे. ४२ दरवाजांसाठी १८५४.९९ घन फुटाचे लाकूड वापरून राममंदिरातील गर्भगृह, तळमजला व पहिला माळा, लाकडी दरवाजासाठी २, तळमजला जिन्याच्या लाकडी दरवाजासाठी २, मध्यभागी मंडपात लाकडी दरवाजासाठी १६, बाहेरील मंडप लाकडी दरवाजासाठी १८ तसेच पहिला व दुसरा माळा जिन्याच्या लाकडी दरवाजासाठी ४ असे एकूण १८५४.९९ घन फुट सागवान लाकडाची मागणी केली असून एवढे सागवान अयोध्येसाठी रवाना होणार आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली दि, ३० मार्च  : अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणारे सागवान गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वन विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातून पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगून सर्व देशाची दिशाभूल करीत असल्याने वादाला नवीन तोंड फुटले असतांना आलापल्ली येथून अयोध्येतील राममंदिरासाठी सागवान पाठविण्यात आले असल्याने देशभरात गौरवाने नक्षलग्रस्त गावाचे नाव उंचावले आहे.

आलापल्ली येथे रामभक्तांनी २६ मार्चला शासकीय क्रकचालय (Saw Mill) या ठिकाणी उपस्थित वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल यांनीही विधिवत सागवनाचे काष्टपूजन केले. त्यानंतर आलापल्ली शहरातून शोभायात्रा काढून झाल्यानंतर तब्बल दोन दिवसांनी “त्या मुजोर” वन विकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अहेरी पोलिस ठाण्यात रामभक्तांविरुद्ध विनापरवाना काष्टपूजन करून शोभायात्रा काढल्याचा आरोप करत तक्रार अर्ज दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर दुसरीकडे सदर मुजोर अधिकारी स्वत: सागवनाची काष्टपूजन केले असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी असलेल्या रामभक्तांनी केला आहे. त्यामुळे ते गुन्हेगार नाही फक्त रामभक्तच दोषी कसे या आरोपाच्या फैर्यांमुळे शहरात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली असून “त्या मुजोर” अधिकाऱ्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात  आहे.

पत्रपरिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली टीका 

अयोध्येतील राम मंदिरासाठी लागणारे सागवान गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविकास महामंडळामार्फत  पाठवण्यात येत आहे. मात्र, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगून सर्व देशभरातील नागरिकांची दिशाभूल करून श्रेय चंद्रपूरला देत असल्याची टीका पत्रपरिषदेत  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी आरोप केले आहे.

पांडुरंग भोये वनपरिक्षेत्र अधिकारी आगार डेपो नागेपल्ली यांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून आज दि. ३० मार्च रोजी चौकशीसाठी बोलाविण्यात आले असता कार्यालयीन कामासाठी बल्लारशा येथे गेल्याचे सांगितले असून आज हजर होऊ शकले नाही. 

किशोर मानभाव,
पोलीस निरीक्षक अहेरी 

हे देखील वाचा : 

रामनवमीच्या दिवशी मोठी घटना, मंदिरात पूजा सुरु असतानाच 25 भाविक पडले विहिरीत

 

Comments are closed.