Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना.

  • पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

मुंबई डेस्क २४ नोव्हेंबर ;- कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत . महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.