Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

12 दिवसात तब्बल 2 रुपयांनी महागलं इंधन, अनेक शहरात पेट्रोलचे दर 105

मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 102.30 रुपये तर डिझेलचे दर 94.98 रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 12 जून:- गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या  किंमतीत भरमसाठ वाढ होत आहे.  गेल्या काही दिवसांपासून वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर सामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. केवळ जून महिन्यात पेट्रोलचे दर जवळपास 2 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर देशातील अनेक शहरात पेट्रोलचे 105 रुपये प्रति लीटरच्या जवळपास पोहोचले आहेत. मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 102.30 रुपये तर डिझेलचे दर 94.98 रुपये प्रति लीटर आहेत.

12 दिवसात झाली एवढी वाढ

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. जूनमध्ये केवळ 12 दिवसात पेट्रोलचे दर 1.63 रुपयांनी वधारले आहेत. तर डिझेलचे दर देखील 1.60 रुपये प्रति लीटरने वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

देशातील महत्वाच्या शहरातील इंधनाचे दर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिल्ली – 96.12 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.98 रुपये प्रति लीटर

मुंबई – 102.30 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर

कोलकाता – 96.06 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.83 रुपये प्रति लीटर

चेन्‍नई – 97.43 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.64 रुपये प्रति लीटर

बेंगळुरु – 99.33 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.21 रुपये प्रति लीटर

नोएडा – 93.46 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 87.46 रुपये प्रति लीटर

जयपूर – 102.73 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.92 रुपये प्रति लीटर

भोपाल – 104.29 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.60 रुपये प्रति लीटर

Comments are closed.