LIVE VIDEO- राजधानी दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव
जीव वाचवण्यासाठी विद्यार्थी खिडकीतून उतरले.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नवी दिल्ली, 15 जून – गेल्या काही दिवसांत भारतामध्ये आगीच्या घटना वाढल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली.या इमारतीमध्ये कोचिंग क्लासेस चालतात आणि याच इमारतीला आग लागली. इमारतीमध्ये ये-जा करण्यासाठी एकाच ठिकाणी पायऱ्या आहेत. आगीमुळे विद्यार्थ्यांना खिडकीमधून बाहेर काढण्यात आलं. हा थरार थक्क करणारा होता. या घटनेमुळे कोचिंग क्लासच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
LIVE VIDEO- राजधानी दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव#delhi #cochingcenter #fire #Delhi #CycloneBiporjoy #uttrakhand #Gujaratcyclone #haridwar #Students pic.twitter.com/PvGcZhmv9S
— loksparshnews (@loksparshnews) June 15, 2023
आग सध्या आटोक्यात असल्याची माहिती मिळाली आहे. तर या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, 40 पेक्षा जास्त विद्यार्थी येथील कोचिंग क्लासेसमध्ये होते. यादरम्यान, ही आग लागली. सध्या या आगीवर नियंत्रण आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. चार विद्यार्थी जखमी झाले आहे.
दुपारी १२ च्या सुमारास या इमारतीला आग लागली. इमारतीमध्ये एकाच ठिकाणी ये-जा करण्यासाठी पायऱ्या आहेत. परिणामी मुलांना तत्काळ इमारती बाहेर पडता आले नाही. आगी पसरत चालल्याने मुलांमध्ये भीती पसरली. तेथे उपस्थित नागरिकांनी मुलांना रश्शीच्या मदतीने खाली उतरवले. सर्व मुलांना सुखरुप तेथून बाहेर काढण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्रिशमनच्या ११ गाड्या दाखल झाल्या. आग नियंत्रणात आली आहे. आग लागलेल्या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ईलेक्ट्रीक बोर्डाला आग लागली होती. ही आग हळूहळू पसरत गेली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हे पण वाचा :-
Comments are closed.