Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या?

जानेवारीचा अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 31 डिसेंबर:- तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करण्यास उत्सुक आहात. कारण २०२० हे वर्ष कोरोनात गेले. लॉकडाऊनमुळे जवळपास सात ते आठ महिने घरातच गेले.  त्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली. मात्र, तोपर्यंत २०२० हे वर्ष संपत आले. आता उद्यापासून २०२१ हे वर्ष लागत आहे. २०२१ या वर्षाकडे लोक मोठ्या आशेने पाहात आहेत. मात्र, नव वर्षाच्या पूर्वसंध्येला कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका असल्याने सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे नव वर्षातील पहिले काही महिने जरा टेन्शनचे जाणार आहेत. मात्र, नववर्ष चांगलेच असेल, अशी अपेक्षा धरणे चुकीची नाही. या नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. त्यामुळे एन्जॉय करता येणार आहे. पाहा नव्या वर्षात किती आहेत सुट्या!

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना 

जानेवारीचा अर्धा महिना बँका बंद राहणार आहेत. कारण जानेवारीत तब्बल १४ दिवस ‘बँक हॉलिडे’ आहे. केवळ १७ दिवस बँका सुरू राहणार आहेत. ५ रविवार, २ शनिवारसोबत विविध सणांच्या सुट्ट्या आहेत. जानेवारी महिन्यात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाची एकच सुट्टी आहे. मात्र, २०२१ मध्ये २६ जानेवारी हा दिवस मंगळवारी येत आहे. म्हणून शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांना सोमवारची सुट्टी घेऊन चार दिवसांची सुट्टी घेऊन तुम्हाला फिरण्यास जाता येऊ शकते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एप्रिल, मे आणि जून  

एप्रिल महिन्यात भरपूर सुट्ट्या आहेत. २ एप्रिलला गुड फ्रायडे, १३ गुढीपाडवा, १४ एप्रिलला आंबेडकर जयंती आणि २१ एप्रिलला राम नवमीची सुट्टी असणार आहे. २५ ला महावीर जयंती रविरवारी आली आहे. मे महिन्यात, १ मे शनिवार, १२ मे रोजी ईद-उल-फितरची सुट्टी आहे, तर २६ मे रोजी बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे. मात्र, जून महिन्यात एकाही सुट्टी नाही.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर  

– जुलै महिन्यात केवळ एकच सुट्टी आहे. बुधवारी, २१ जुलै रोजी ईद-उल जुहाची (बकरी ईद) सुट्टी असणार आहे. 

१५ ऑगस्टला रविवार असणार आहे. १९ ऑगस्ट रोजी शुक्रवारी मोहरमची सुट्टी असणार आहे. यावेळी तुम्ही तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. यावर्षी, जन्माष्टमी उत्सव सोमवारी, ३० ऑगस्टला आहे. 

– तर, सप्टेंबरमध्ये एकही सुट्टी नाही.

ऑक्टोबर महिना  

दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. गुरुवारी, ७ ऑक्टोबर रोजी अग्रसेन जयंती आहे. शुक्रवार, १५ ऑक्टोबर रोजी दसरा हा सण आहे. या आठवड्यातही आपण तीन दिवसांच्या सुट्टीची योजना आखू शकता. १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारच्या दिवशी ईद-ए-मिलाद आहे, तर २० ऑक्टोबर रोजी महर्षि वाल्मिकी जयंती बुधवारी आली आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर 

दिवाळी गुरुवारी, ४ नोव्हेंबरला असणार आहे. या आठवड्यातही आपण शुक्रवारची सुट्टी घेऊन चार दिवस सुट्टी घेवून छोट्या टूरची योजना आखू शकता. २५ डिसेंबर अर्थात ख्रिसमसच्या दिवशी शनिवार आहे.

काही सुट्या शनिवार आणि रविवार या (holidays on weekend) दिवशी असल्या तरी, काही सुट्ट्या आठवड्याच्या शेवटी आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सलग तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेऊ शकाल. नवीन वर्षात सुमारे १० लाँग विकेंड येणार आहे. तर, ९ वेळा या सुट्ट्या नेमक्या आपल्या सुट्ट्यांच्या दिवशी येणार आहेत.

Comments are closed.